
देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्याचे नाव घेत नाहीय. त्यामुळे हतबल झालेल्या पेंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोरोना फैलावाची सध्याची परिस्थिती विचारात घेता नागरिकांनी आता कुटुंबीयांसोबत घरात वावरतानाही मास्क लावावा, तसेच पाहुण्यांना घरात बोलावणे टाळावे, अशा सूचना निती आयोगाने केल्या आहेत.
निती आयोगातील आरोग्य मंत्रालयाचे प्रतिनिधी डॉ. व्ही. के. पॉल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत नव्या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती दिली. मास्क लावल्यामुळे संसर्गाचा धोका 30 टक्क्यांनी टाळता येऊ शकतो. दररोज कोरोना संसर्गाचे नवनवे आकडे लोकांची चिंता वाढवत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. पॉल यांनी भीती न पसरवण्याचेही आवाहन केले. कुणीही भीती पसरवू नये. त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडेल. कुठल्याही दुसऱया कुटुंबासोबत बसत असाल तर जरुर मास्क लावला पाहिजे, असे डॉ. पॉल यांनी सुचवले.
महिलांनी मासिक पाळीदरम्यान लस घेऊ नये, या अफवेचे सरकारने खंडन केले आहे. लस आणि मासिक पाळीचा काहीही संबंध नाही. महिलांनी मासिक पाळीदरम्यान लस घेणे नुकसानदायी नसून सुरक्षित आहे, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.





























































