पुलवामा हल्ल्याचा सरकारकडून निषेध, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामामध्ये सीआरपीफ जवानांवर झालेल्या हल्ल्याचा केंद्र सरकारकडू निषेध करण्यात आला आहे. केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा दहशवादी हल्ला भ्याड असल्याचे म्हटले आहे. त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली असून जखमींसाठी प्रार्थना केली आहे. तसेच सिंह यांनी राज्यपालांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी हा हल्ला भीषण असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

केंद्रिय रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच जखमी जवान लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहीदांचे बलिदान मातृभूमी कधीच विसरणार नाही असे म्हटले आहे. तसेच त्यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या कुटुबीयांसोबत आपण असल्याचे म्हटले आहे.