दसऱ्यापूर्वी महागाई भत्त्यात होणार वाढ? वाचा बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे. दसऱ्यापूर्वी ही वाढ करण्यात येऊ शकते. या आधी राज्य सरकारांनी आपल्या महागाई भत्त्यात वाढ केली होती.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस महागाई भत्त्यातील वाढीसंदर्भात निर्णय होऊ शकतो. यापूर्वी मार्च 2022मध्ये केंद्राने महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ केली होती. त्यामुळे महागाई भत्त्याचं प्रमाण वाढून 31 वरून 34वर गेलं होतं. आता पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढवण्यात येणार आहे.

पण, ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. यावेळी सरकार चार टक्के इतकी वाढ करणं अपेक्षित आहे. या भत्त्याच्या घोषणेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात घसघशीत वाढ होणार आहे.

जर एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 18 हजार असेल तर 34 टक्के या हिशोबाने त्याचा महागाई भत्ता 6120 रुपये होतो. तर 38 टक्क्याच्या हिशोबाने हीच वाढ 6840 रुपये इतकी होईल. या वाढीचा फायदा 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह 65 निवृत्ती वेतनधारकांना होईल.