लोकलचे चाक घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेची अप धिम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. विद्याविहार ते कुर्ला स्थानकादरम्यान लोकलचे चाक रुळावरून घसरल्यामुळे कल्याणहून सीएसएमटीकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

mumbai-local

विद्याविहार ते कुर्ला स्थानाकादरम्यान लोकलचे अप धिम्या मार्गावर हा अपघात झाला असून यात कोणत्याही प्रवाशांना दुखापत झालेली नाही. दरम्यान, अप धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली आहे. तसेच घटनास्थळी रेल्वेचे कर्मचारी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.