सीएसएमटीत ‘एआर’ची जादू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानकात ऑगमेंटेड रिऍलिटी (एआर) तंत्रज्ञान बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांनी स्क्रीनसमोर मोबाईल हातात धरून उभे राहताच आभासी जगाची सैर करता येणार आहे. यामध्ये अधूनमधून रेल्वेगाडय़ांचे डिजिटल वेळापत्रकही दिसणार आहे. एआर स्क्रीनच्या कामासाठी एका कंपनीला पाच वर्षांचे कंत्राट दिले आहे. कंपनी जाहिरातीतून उत्पन्न कमविणार आहे. पाच वर्षांसाठी रेल्वेला 50 लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. सीएसएमटी स्थानकाच्या फलाट क्रमांक 11 आणि 12 येथे ही सुविधा सुरू होणार आहे. प्रवाशांचे मनोरंजन करण्यासाठी दर महिन्याला यामध्ये नावीन्यपूर्ण बदलही केला जाणार आहे. यामध्ये जंगल सफारी, बर्फाळ प्रदेश किंवा अन्य आभासी अनुभव घेण्याचा आनंद मिळेल. याच्या आराखडय़ाला मंजुरीही मिळाली असून दोन महिन्यात प्रवाशांसाठी ही मनोरंजन सुविधा सुरू होणार आहे.