मध्य रेल्वेच्याही लोकलना धिमा थांबा आजपासून 22 अतिरिक्त स्लो लोकल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई – मध्य रेल्वेवर राज्य सरकारच्या मागणीनूसार अत्यावश्यक कर्मचाऱयांसाठी 431 फेऱया चालविण्यात येत आहेत. ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखण्यासाठी वाढती गर्दीपाहून उद्या 10 ऑक्टोबरपासून यात 22 अतिरिक्त फेऱयांचा समावेश करण्यात येणार असून एकूण फेऱयांची संख्या आता 453 इतकी होणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना दिलासा मिळणार आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी 15 जूनपासून मर्यादित प्रमाणात फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवर 506 तर मध्य रेल्वेवर 431 फेऱया चालविण्यात येत होत्या. मध्य रेल्वेवर सर्व लोकलना जलद थांबेच देण्यात आले होते. त्यामुळे धिम्या मार्गावरील स्थानकाजवळ राहणाऱयांची गैरसोय होत होती.

त्यामुळे मध्य रेल्वेने उद्यापासून 22 अतिरिक्त धिम्या फेऱया चालविण्याची घोषणा केली आहे. आधीच्या 431 लोकलच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
22 लोकलचे थांबे असे असणार
सीएसएमटी – कसारा स्पेशल
तानसेत आणि उंबरमाळी वगळून सर्व थांबे घेणार
सीएसएमटी – कर्जत स्पेशल
शेलू वगळून सर्व थांबे घेणार
सीएसएमटी – पनवेल स्पेशल
रे रोड, कॉटन ग्रीन, चुनाभट्टी व मानसरोवर वगळून सर्व थांबे