मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिराने, प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-local

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्य रेल्वेच्या भांडुप-कांजुरमार्ग रेल्वे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून धावणाऱ्या एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र रेल्वेकडून हा बिघाड दुरुस्त करण्यात आला असून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र या बिघाडामुळे रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांची वाहतूक उशिराने सुरू आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या नोकरदारवर्गाला मोठा फटका बसला असून प्रवासी वैतागले आहेत.

मध्य रेल्वेवरची वाहतूक विविध कारणांमुळे विस्कळीत होते. मंगळवारी सकाळी प्रवाशांना याचा पुन्हा अनुभव आला आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. दरम्यान, बिघाड झाल्याची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे कर्मचारी तेथे दाखल झाले आहेत. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असेल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.