मध्य रेल्वेला क्राँसिंगचा फटका; कल्याण-ठाणे दरम्यानची वाहतूक ठप्प

623
kalva-station

तांत्रिक बिघाडांमुळे अनेकदा विस्कळीत होणाऱ्या मध्य रेल्वेला गुरुवारी पुन्हा एकदा फटका बसला आहे. कळवा येथील लेव्हल क्रॉसिंग गेट जास्त काळ सुरू ठेवल्याने कल्याण-ठाणे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. तर धीम्या मार्गावरील अप-डाऊन अशा दोन्ही मार्गावरील गाड्यांची वाहतूक काही काळासाठी बंद ठेवावी लागली.

दरम्यान, बुधवारी देखील याच कारणामुळे मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. कळवा फाटकाचा मुद्दा गेली 10 वर्षे रखडलेला आहे. रेल्वे प्रशासनाने मात्र अद्याप कोणतीहे पाऊल उचलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या