मध्य रेल्वेही गणेश विसर्जनाला भक्तांसाठी रात्रभर लोकल चालवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री गणपती विसर्जनानिमित्त गणेशभक्तांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरार दरम्यान दहा लोकल सोडलेल्या असताना मध्य रेल्वेही सीएसएमटी-कल्याण आणि पनवेल स्थानकांदरम्यान 10 विशेष लोकल गाडय़ा चालवणार आहे. या उपनगरीय विशेष लोकल गाडय़ा सर्व स्थानकांवर थांबतील.

मेन लाईन – अप स्पेशल

सीएसएमटीकरिता कल्याणहून रा. 12.05 वा. विशेष लोकल सुटेल आणि सीएसएमटी येथे मध्यरात्री 1.30 वा. पोहोचेल.
सीएसएमटीकरिता विशेष लोकल ठाणे येथून रा. 1.00 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे मध्यरात्री 2.00 वा. पोहोचेल.
सीएसएमटीकरिता विशेष लोकल ठाणे येथून मध्यरात्री 2.00 वा. सुटेल आणि सीएसएमटी येथे पहाटे 3.00 वा. पोहोचेल.

हार्बर लाइन – अप स्पेशल
सीएसएमटीकरिता विशेष लोकल पनवेल येथून रात्री 1.00 वा. सुटेल आणि सीएसएमटी येथे मध्यरात्री 2.20 वा. पोहोचेल.
सीएसएमटीकरिता विशेष पनवेल येथून मध्यरात्री 1.45 वा. सुटेल आणि सीएसएमटी येथे मध्यरात्री 3.05 वा. पोहोचेल.

मुख्य लाईन – डाऊन स्पेशल
कल्याण विशेष लोकल सीएसएमटी येथून मध्यरात्री 1.40 वा. सुटेल आणि कल्याण येथे पहाटे 3.10 वा. पोहोचेल.
ठाणे विशेष लोकल सीएसएमटी येथून मध्यरात्री 2.30 वा. सुटेल आणि ठाणे येथे मध्यरात्री 3.30 वा. पोहोचेल.
कल्याण विशेष लोकल सीएसएमटी येथून मध्यरात्री 3.25 वा. सुटेल आणि कल्याण येथे पहाटे 4.55 वा. पोहोचेल.

हार्बर लाइन – डाऊन स्पेशल
पनवेल विशेष लोकल सीएसएमटी येथून मध्यरात्री
1.30 वा. सुटेल आणि पनवेल येथे मध्यरात्री 2.50 वा. पोहोचेल.
पनवेल विशेष लोकल सीएसएमटी येथून मध्यरात्री 2.45 वा. सुटेल आणि पनवेल येथे पहाटे 4.05 वा. पोहोचेल.