परीक्षा झाल्या, निकाल लागले पण गुणपत्रिकाच नाही; मुंबई विद्यापीठाचा  अजब कारभार

कोरोना संकटामुळे एप्रिल-मे महिन्यात होणाऱया परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्या घेतल्या गेल्या. निकालही जाहीर झाले परंतु मुंबई विद्यापीठाच्या अजब कारभारामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका अद्याप मिळालेल्या नाहीत. गुणपत्रिका हाती नसल्याने पुढील शिक्षण तसेच नोकरीसाठी विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

कोरोनामुळे गेल्या मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला गेला. परिणामी एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात येणाऱया परीक्षा सुरक्षेच्या कारणास्तव पुढे ढकलल्या गेल्या. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सक्तीमुळे त्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करून घेतल्या गेल्या. मुंबई विद्यापीठाने त्या परीक्षांचे निकाल तातडीने लावून विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता. परंतु गुणपत्रिका मात्र अद्याप मिळालेल्या नाहीत.

गुणपत्रिका लवकरात लवकर द्यायुवा सेना

मुंबई विद्यापीठातील युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी यासंदर्भात पुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना निवेदन दिले आहे. गुणपत्रिका हाती नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणे कठीण झाले आहे. इतकेच नव्हे तर नोकरीसाठीही प्रयत्न करता येत नाहीत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्वरित मिळाव्यात यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या