चांदणी पालशेतकर यांना पीएच.डी.; नावीन्यपूर्ण संशोधनासाठी सन्मान

माहीम येथे राहणाऱया चांदणी जयंत पालशेतकर यांना फ्रान्स येथील इकोल सुपरीयर रॉबर्ट दी सोर्बोन या प्रख्यात विद्यापीठाची डॉक्टरेट म्हणजेच पीएच.डी. पदवी मिळाली आहे. दुबईत आयोजित सोहळय़ात त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. फिलॉसॉफी या विषयात करण्यात आलेल्या संशोधनाबद्दल त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला.  अतिशय नावीन्यपूर्ण आणि सर्जनशील बदलांच्या अनुषंगाने केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी ही पदवी चांदणी पालशेतकर यांना प्रदान करण्यात आली. ही अतिशय महत्त्वाची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांच्यावर नातेवाईक, मित्रमंडळींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यूके येथील लीड्स विद्यापीठातून फायनान्स आणि अकाऊंटिंगमधून मास्टर्स डिग्री प्राप्त केल्यानंतर चांदणी यांनी फॉर्च्युन-500 सॅनोफी या पंपनीत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कामाला सुरुवात केली. क्लिनिकल रिसर्च युनिटसाठी त्यांनी सहाय्यक म्हणून अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.