Lok sabha 2019 : प्रशांत किशोर ‘बिहारी डाकू’; चंद्राबाबूंची जीभ घसरली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आंध्र प्रदेशातील लाखो मतदारांची नावे मतदार यादीतून हटवली आहेत. ते सायबर गुन्हे करत असून बिहारी डाकू आहेत, अशी टीका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून देशभरात विविध पक्षांच्या नेत्यांची जीभ घसरू लागली आहे. त्यात आता चंद्राबाबू यांची भर पडली आहे. या आधीही चंद्राबाबू यांनी जगमोहन रेड्डी, टीआरएस आणि भाजपवर मतदारांची नावे यादींमधून हटवल्याचा आरोप केला होता.