चंद्रपूर – विनाकारण फिरणाऱ्या 68 जणांची अँटिजन तपासणी, सहा जण आढळले बाधित

लॉकडाऊन असताना वारंवार बाहेर फिरणाऱ्यांवर पायबंद घालण्यासाठी तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड तपासणी करण्याची योजना आखली आहे.  विनाकारण फ़िरणाऱ्या 68 जणांची अँटिजन तपासणी करण्यात आली. यात सहा जण बाधित आढळले. या मोहिमेमुळे काही वेळातच शहरात स्मशान शांतता निर्माण झाल्याचे दिसून आले.

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन असल्याने फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे केले होते. मात्र बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नव्हती. त्यामुळे मूल तालुका प्रशासन, नगर प्रशासन व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची अँटिजन तपासणी करण्याची योजना आखली होती.

आपली प्रतिक्रिया द्या