चंद्रपुरात अल्पवयीन मुलीचे लावले लग्न, आईसह पाच जणांवर गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह आईने इतर चार जणांशी संगनमत करून केल्याची घटना उघडकीस आली. मुलीच्या मोठ्या बहिणीच्या तक्रारीवरून आईसह पाच जणांवर भद्रावती पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. यातील चार जणांना अटक करण्यात आली असून मुलीची आई फरार आहे.

सविता अवसारे वय 49 वर्ष, बसंती तांडे वय 44, विक्रम अंजीरवार वय 25, अरविंद मालवीय वय 27 असे आरोपींची नावे आहेत. यातील मुलीची आई संगीता ही फरार आहे .

15 वर्षीय अल्पवयीन  मुलीला आईने दोन आरोपीच्या संगनमताने राजापूर येथे 21  एप्रिल ला विवाह करून दिला. या घटनेची माहिती मुलीची मोठ्या बहिणीला मिळताच तिने या भद्रावती पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भद्रावती चे ठाणेदार यांनी विशेष पथक तयार केले . सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी या घटनेचा पूर्ण तपास करून या घटनेतील आरोपींना मध्यप्रदेश तसेच भद्रावतीतुन अटक केली  यातील फरार महिला आरोपीचा भद्रावती पोलीस शोध  घेत आहेत.