
कुलरचा स्पर्श होवून विजेचा जोरदार धक्का लागल्याने पाच वर्षिय बालकाचा दुदैवी अंत झाल्याची घटना जिल्ह्यातील मुल येथे घडली. युग महेश जेंगठे असे मृतक बालकाचे नाव आहे.या घटनेने शोककळा पसरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी महेश जेंगठे यांचे घर संत गजानन महाराज मंदिर परिसरात आहे. त्यांचा पाच वर्षीय मुलगा युग महेश जेंगठे नेहमी प्रमाणे मोठा भाऊ आणि मित्रांसोबत अंगणात खेळत होता. खेळत असतांना युगच्या हाताचा स्पर्श घरातील कुलरला झाला. त्याच वेळी युगला विजेचा जोरदार धक्का लागला. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरीता हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी युगला मृत घोषित केले. यूग हा सेंट अँन्स हायस्कूलचा विध्यार्थी होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने मागील महिनाभरापासून तो घरीच राहत आहे अशात आज ही दुदैवी घटना घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.




























































