
चोरीची तब्बल 26 वाहने चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केली आहेत. या प्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही वाहने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चंद्रपूर शहर, सिंदेवाही, चिमूर, मूल, शेगाव सह नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतून चोरट्यांनी पळवली होती. वाहनांची एकूण किमत 6 लाख 85 हजार रुपये आहे. यासह अन्य पोलीस ठाण्यातील प्रकरणेही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणली आहेत.
वरोरा तालुक्यातून सोन्याचे दागिने आणि रोख पळविल्याप्रकरणी शाहरुख अस्लम शेख, राकीब सगीर सिद्धीकी यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 2 लाख 19 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुर्गापूर येथील अमोल इलमकर याच्याकडूनही चोरीची वाहने जप्त करण्यात आली. त्याच्याकडून काही मोबाईल जप्त करण्यात आले आहेेे. या प्रकरणात आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.




























































