
चंद्रपूरमधील रयतवारी कॉलनी परिसरात असलेल्या नाल्यात जखमी अवस्थेत मगरीचे पिल्लू आढळले. स्थानिकांना लक्षात येताच त्यांनी मगरीच्या पिल्लाला पकडून वनविभागाचा ताब्यात दिले. चंद्रपूर येथील रेस्क्यू सेंटरला उपचारासाठी मगरीचे पिल्लू नेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शहरालगत वाघाचे दर्शन झाले होते. आता शहारातील मध्यवर्ती भागात मगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

































































