
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात लाखो बौद्ध बांधवाना ऐतिहासिक दीक्षा दिल्यानंतर देशातील केवळ दुसरा दीक्षा सोहळा चंद्रपुरात पार पडला होता. चंद्रपूरला आयोजित झालेल्या या घटनेचे स्मरण म्हणूनच दरवर्षी 15 आणि 16 ऑक्टोबर अशा दोन दिवशी मोठ्या उत्साहात धम्मचक्र अनुवर्तन दिन साजरा केला जातो.
चंद्रपूरात आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याच्या काना-कोपऱ्य़ातून लाखो बौद्ध बांधव सहभागी होतात. यंदाचा हा 64 वा सोहळा कोरोनामुळे रद्द करण्यात आला असून यावर्षी बुद्धवंदना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचे कार्यक्रम घरीच करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

























































