चंद्रपूरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलला वन विभागाने केले जेरबंद

667

चंद्रपूर शहरातील दुर्गापुर भागात घनदाट वस्तीत अस्वलीच्या शिरकाव्याने एकच खळबळ उडाली आहे. ऊर्जानगर -कोंडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्री आठच्या सुमारास ही अस्वल आढळल्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली. अस्वलीच्या वावरानंतर मोठ्या संख्येत बघ्यांची गर्दी जमली. गर्दीने घाबरलेल्या अस्वलीने शाळेच्या मागच्या भागात असलेल्या प्रसाधनगृहाच्या सांदीत आश्रय घेतला. वनविभागाच्या चमूने सुमारे तीन तास मेहनत घेत बेशुद्धीचे डार्ट मारून अस्वलीला बेशुद्ध केले. यानंतर ही अस्वल पिंजरा बंद करण्यात आली. या भागात असलेल्या शक्तिनगर या वसाहतीत दोन दिवस आधी या अस्वलीने धुमाकूळ घातला होता. तर दुसरीकडे लगतच्या कोळसा खाण परिसरातील कर्मशाळेतही अस्वलीने ठाण मांडले होते. आता ही अस्वल जेरबंद झाल्यानंतर सततच्या अस्वलीच्या वावराने त्रस्त असलेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या