चंद्रपूरमध्ये कब्बडी सामन्यादरम्यान प्रेषक गॅलरी कोसळली, सात जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात सुरू असलेल्या आमदार चषक स्पर्धेत प्रेषक गॅलरी कोसळल्याने सात गंभीर तर दहा ते बारा जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीवर प्राथमिक उपचार करून त्यांना चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.

वरोरा येथे दरवर्षी कब्बडी सामन्याचे आयोजन केले जाते. शनिवारपासून स्पर्धेला सुरुवात झाली. पहिलाच दिवस असल्याने सामना बघायला प्रेषकांनी मोठी गर्दी केली होती. अशात ही दुर्घटना घडली.