चंद्रपूरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, मुंडके केले धडावेगळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर येथील 35 वर्षीय महेश मेश्राम या तरुणाची 3 ते 4 जणांनी मिळून रात्री हत्या केली. दुर्गापूर मुख्य मार्गावर हे हत्याकांड घडले. आरोपीनी आधी महेश मेश्राम याला मारहाण केली, त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचं शीर धडावेगळे केलं. महेश मेश्राम याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात तर शीर काही अंतरावर पडलेले होते. मृतक महेश मेश्राम याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते तो नुकताच कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. आरोपी व मृतकाचा वाद नेमका कशामुळे झाला याचा पोलीस तपास करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.