Video – उकाड्याने हैराण झालेल्या माकडांनी शोधली अनोखी शक्कल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्याचं नाव काढताच जिथं अंगाला घाम फुटतो, ते शहर म्हणजे चंद्रपूर. जणू काही सूर्यच डोक्यावर नाचतो की काय, अशी इथं परिस्थिती आहे. या तापलेल्या परिस्थितीशी जुळवून घेत माणसं एकेक दिवस काढतात. पण प्राणी कसे जगत असतील, हा मोठाच प्रश्न आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडले आहेत आणि शहरात-गावात त्यांना कुणी येऊ देत नाही.

अशा स्थितीत प्राण्यांनी काय करावं, हा प्रश्नच आहे. पण मुक्या प्राण्यांनी इथेही आपली बुद्धी वापरली. माकड हा माणसाचा पूर्वज म्हटल्यावर किमान या प्राण्याला थोडीफार बुद्धी अपेक्षित आहेच. याच बुद्धिमान प्राण्याने उकाड्याची काहिली शांत करण्यासाठी अनोखी शक्कल शोधली.

कोरपना तालुक्यातील एक व्हीडीओ सध्या व्हायरल झाला असून, यात माकडाची पिल्लं घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत स्विमिंग टॅंकची मजा घेत आहेत. प्लास्टिक टॅंकला झाकण नसल्याचा पुरेपूर फायदा उचलत या माकड पिल्लांनी पाण्याचा आणि पोहण्याचा मनमुराद आनंद लुटला.

चार-पाच माकडांची ही टोळी उन्हापासून बचाव करण्यासाठी कशारीतीनं डोकं चालवत आहे, हेही यातून दिसतं. 46 अंशावर पारा गेल्यानं प्राणीही आपापल्यापरीनं किती आणि कशी काळजी घेतात, हे दाखवणारा हा व्हिडीओ सध्या चांगलाच गाजत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)