
अमली पदार्थ विक्रीप्रकरणी दोन कुख्यात महिला आरोपींना अटक, गांजासदृश अमली पदार्थ व विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करत चंद्रपूर शहर पोलिसांनी कारवाई केली. मुस्कान खैरे (33), पुष्पा बानलवार (55) अशी अटकेतील महिलांची नावे असून दोघीही शहरातील भिवापूर परिसरात राहतात. घरात टाकलेल्या धाडीत फुले, बिया, देठे, अशी गांजासदृश 1 किलो 157 ग्रॅम अमली पदार्थ आढळून आले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून दोन्ही महिलांना गुन्हा दाखल करीत अटक केली. ही कारवाई शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी केली. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.