
संख्येने 52 टक्के असलेल्या ओबीसी प्रवर्गाला तेवढेच आरक्षण द्यावे, 2021 ला ओबीसी गणना करावी, या मागण्यांसाठी आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चंद्रपुरात थाळी बजाव आंदोलन करण्यात आले.
प्रारंभी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बंगल्यापुढे हे आंदोलन केले गेले. हातात मागणीचे फलक आणि जोरदार नारेबाजी करीत आंदोलक थाळी वाजवीत होते. लोकप्रतिनिधींच्या घरापुढे आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापुढेही हे आंदोलन केले जाणार आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जात आहे. यावेळी ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, नंदू खनके सह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात उपस्थिती होती.























































