चंद्रपूर- स्वस्त धान्य दुकानात अफरातफर, चिमूर येथील प्रकार उघड

स्वस्त धान्य दुकानातील धान्याची मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर इथे उघड झालाय. त्यामुळे या दुकानदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली. 2010 ते 13 या तीन वर्षात चिमूर येथील दहा स्वस्त धान्य दुकानांनी धान्याची अफरातफर केल्याची बाब पुढे आली.

गरिबांच्या वाट्याचं धान्य खुल्या बाजारात विकून या दहा दुकानदारांनी मोठा भ्रष्टाचार केला. या संदर्भात पुरवठा विभागाकडे तक्रारी झाल्यावर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात हा भ्रष्टाचार उघड झाला. त्यामुळे या दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. सोबतच अफरातफर केलेल्या धान्याचे पैसे वसूल करण्यासाठी प्रशासनानं या दुकानदारांना नोटीस बजावल्या, पण पैशांचा भरणा न केल्याने आता त्यांच्या मालमत्तांवर टांच आणण्याची तयारी सुरू झाली असून, तलाठ्यांना सदर दुकानदारांच्या मालमत्ता शोधण्याचे निर्देश देण्यात आले. ही माहिती प्राप्त होताच मालमत्ता ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे. चिमूरचे तहसीलदार तुलसीदास कोवे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या