चंद्रपूर – सॅटेलाईटचा पाचवा सिलेंडर ब्रम्हपूरीत सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आकाशातून पडलेल्या वस्तूंचे अवशेष सापडण्याची मालिका अजूनही सुरूच आहे. लाडबोरी, पवनार, मरेगाव, आसोलामेंढा येथे सॅटेलाईटचे अवशेष सापडले होते. आतापर्यत एक लोखंडी रिंग, चार सिलेंडर सापडलेत. आज पुन्हा ब्रम्हपुरी तालुक्यात पाचवा लोखंडी गोळा सापडला आहे.

तालुक्यातील बोद्रा परिसरात हा लोखंडी गोळा आढळला. स्थानिकांचा मदतीने हा गोळा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. आतापर्यंत पाच गोळे आणि एक रिंग सिंदेवाही तालुक्यात सापडले आहेत. ही मोठी खगोलीय घटना चंद्रपूरात घडली. या घटनेचे कुतूहल अद्यापही ओसरले नाही. मात्र सध्यातरी कुठल्याही विशेष पथकाचा टीमने या अवशेषांशी पाहणी केलेली नाही.