फळ्यावर ‘मला जगायचं नाही’ लिहून बारावीतील विद्यार्थ्यांची वर्गातच आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील चौघान गावात बारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वर्गातच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रवींद्र बुराडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. कृषक महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या रवींद्रने आत्महत्या करण्यापूर्वी फळ्यावर ‘मला जगायचं नाही’ असे लिहिले. रवींद्रने नेमकी कोणत्या कारणाने? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

रवींद्र हा चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चौघान गावातील कृषक कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होता. तो 12 वीच्या कला शाखेच्या ब तुकडीत शिक्षण घेत होता. रवींद्रने सोमवारी पहाटेच्या सुमारास वर्गात गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी शाळेतील वर्ग उघडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. यानंतर शाळा व्यवस्थापनाने याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.

chandrapur

आत्महत्या करण्यापूर्वी रवींद्रने फळ्यावर ‘सॉरी प्रिन्सिपाल सर’, असे लिहून ठेवले होते. फळ्यात एका कोपऱ्यात ‘मला जगण्याची इच्छा नाही, मी आत्महत्या करत आहे’, असेही त्याने लिहिले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. रवींद्र आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.