हैद्राबादला मजुरांना घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स पलटली; एक ठार, सतरा गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगड वरून मजुरांना घेऊन घेऊन हैदराबादकडे निघालेली ट्रॅव्हल्स चंद्रपुर जिल्ह्यातील विरुर- धानोरा मार्गावर पलटली. यात एकाचा मृत्यू झाला असून सतरा गंभीर जखमी आहे. ही घटना पहाटे 5 च्या सुमारास घडली.

या ट्रॅव्हल्समध्ये 30 मजूर प्रवास करत होते. जखमींना उप विरुर, राजुरा, चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. जखमींच्या आकडा वाढण्याची शक्यता आहे. गंभीर असलेल्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती पुढे येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात येणाऱ्या विरूर- धानोरा मार्गाने मजुरांना घेऊन जात असताना पहाटेच्या सुमारास चालकांचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स पलटली. यात एकाचा मृत्यू झाला असून सतरा ते अठरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळतातच विरूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमींना बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे.