इथं मेली माणुसकी! कुत्र्याच्या गळ्यात दगड बांधून नदीत फेकलं, चंद्रपुरातील संतापजनक व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माणुसकीला लाजवेल असे कृत्य चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील दहेली या गावामध्ये घडले आहे. एका पाळीव कुत्र्याच्या गळ्यात भला मोठा दगड बांधून आणि तोंड ताराने बांधून त्याला नदीमध्ये फेकून देण्यात आले. घटनेमध्ये निष्पाप कुत्र्याचा मृत्यू झाला. याचा व्हिडीओही संबंधितांकडून व्हायरल करण्यात आला आहे.

बल्लारपूर तालुक्यातील दहेली या गावामध्ये काही युवकांनी एका पाळीव कुत्र्याला अमानुषपणे ठार केले. तीन ते चार युवकांनी प्रथम कुत्र्याच्या गळ्यात दगड बांधला आणि मानेला फास आवळून त्याला नदीच्या पाण्यात मरण्यासाठी फेकून दिले. जिवाच्या आकांताने मोठ्या प्रयत्नाने तो नदीतून पोहून बाहेर आला.

 

पाळीव असल्याने पुन्हा तो त्या युवकांजवळ आला. मात्र त्याला मारण्याचा पूर्णपणे विचार करून आलेल्या युवकांनी त्याचे पाय बांधून भलामोठा दगड बांधला. त्यानंतर तोंडाला ताराने बांधून पुन्हा नदीच्या पाण्यात फेकले. या वेळी मात्र तो पाण्यातून वर आलाच नाही. या संदर्भातील व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)