चंद्रपूर – वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यातील व्याहळ बूज या गावातील ही घटना आहे. वाघाने घरामध्ये शिरकाव करत गंगुबाई गेडाम (52) या महिलेस ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.

घरात झोपायची तयारी करत असताना अचानक वाघाने हल्ला करून महिलेला घरातच ठार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच वनअधिकारी घटनास्थळी पोहोचले. नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या