चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मामडकुटी परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. विद्या वाघाडे (36) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. ही महिला चिमूर तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील रहिवासी आहे.

वनविभागाच्या फायरलाइनच्या कामासाठी ती महिला कंत्राटी मजूर म्हणून या परिसरात काम करत होती. गुरुवारी सकाळी 8.30 च्या दरम्यान वाघाने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ती जागीच ठार झाली. या घटनेनंतर वरिष्ठ वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.