राज्यात 20 नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव

राज्यात नवे 20 जिल्हे आणि 81 तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नवीन जनगणना होईपर्यंत हा प्रस्ताव पुढे नेता येणार नाही. जनगणनेनंतर लोकसंख्या आणि भौगोलिक स्थिती पाहून नवीन जिल्हे आणि तालुके निर्माण करण्यावर विचार करता येईल, असे ते म्हणाले.