राज्यात 20 नवे जिल्हे आणि 81 नवे तालुके? वाचा काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे

राज्यात तब्बल 81 नवे तालुके आणि 20 नवे जिल्हे बनवण्याची हालचाल सुरू झाली आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आल्याची माहिती दिली आहे. राज्याची लोकसंख्या व भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून .याबाबत निर्णय घेतला जाईल असे बावनकुळे यांनी चंद्रपूर येथे बोलताना सांगितले.

राज्यात 20 नवीन जिल्हे आणि 81 नवीन तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. हा निर्णय घेण्यासाठी जनगणना, सीमांकन आणि भौगोलिक स्थितीचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. जोपर्यंत नवीन जनगणनेचे आकडे समोर येत नाही, तोपर्यंत हे करता येणार नाही. मात्र नवीन जनगणनेची आकडेवारी आली की त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थिती पाहून नवीन जिल्हे आणि तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.