
‘चांद्रयान-2’ अखेर मंगळवारी सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत पोचले. पूर्णपणे कक्षेत येण्यासाठी जवळपास अर्धा तास लागला. इस्रोसाठी हा दिवस कसोटीचा होता. त्यात शास्त्रज्ञांना यश मिळवले. आमच्या हृदयाची धडधड जवळजवळ थांबली होती, अशी प्रतिक्रिया इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी हे यश मिळवल्यानंतर दिली.
23 दिवस पृथ्वीभोवतीची कक्षा विस्तारल्यानंतर ‘चांद्रयान’ला चंद्राच्या कक्षेत येण्यासाठी सहा दिवस लागले. यान चंद्राच्या कक्षेत पोहचताना आमच्या हृदयाची धडधड जवळजवळ थांबली होती. शास्त्रज्ञांनी यानाला चंद्राच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया सुरू केली तेव्हा हृदयाची धडधड वेगाने वाढली होती, अशी प्रतिक्रिया इस्रो अध्यक्ष डॉ. सिवन यांनी दिली.



























































