Chandrayaan-2 – किलोमीटरचा मीटर झाला? ‘विक्रम’च्या संपर्काबाबत नव्या चर्चेला उधाण

8870
फोटो - रॉयटर्स

हिंदुस्थानची महत्वकांक्षी अंतराळ मोहीमेपैकी एक ‘चांद्रयान-2’ (Chandrayaan-2)च्या विक्रम लँण्डरकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असताना अखेरच्या क्षणी निराशा हाती लागली. चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटरवर असताना आणि चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास अवघा एक मिनिट बाकी असताना हिंदुस्थानच्या ‘चांद्रयान-2’ मोहिमेतील विक्रम लॅण्डरचा संपर्क तुटल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र विक्रम लॅण्डर संदर्भात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

इस्रोने दिली खुशखबर, विक्रम लँडर सुस्थितीत

‘विक्रम लॅण्डर’ चंद्राच्या पृष्ठभूमीवर ठरल्याप्रमाणे उतरू शकले नाही, पण चंद्राच्या कक्षेत ते गेले. 2.1 किलोमीटरवर असताना त्याचा संपर्क तुटला असे सांगण्यात आले होते. मात्र ‘इंडिया टुडे‘ आणि ‘आज तक‘ दिलेल्या एका वृत्तानुसार, चंद्रापासून 2.1 किलोमीटरवर नाही तर 400 मीटर अंतरावर असताना विक्रम लँण्डरचा संपर्क तुटला. एका फोटोद्वारे हा दावा करण्यात येत आहे.

Chandrayaan 2 – शेतकऱ्याचा मुलगा ते इस्रोचे अध्यक्ष, जाणून घ्या थक्क करणारा प्रवास

काय आहे दावा…
जुलै महिन्यात 22 तारखेला ‘चांद्रयान-2’ जमिनीवरून उडाले. 48 दिवस अंतराळात प्रवास करून पृथ्वीपासून तीन लाख 84 हजार किलोमीटर दूर चांद्रभूमीवर ‘विक्रम’ उतरणार होते. शुक्रवारी 7 सप्टेंबरला विक्रम लॅण्डर चंद्रावर उतरणार होते. ‘इस्त्रो’ कार्यालयातून याचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू होते. विक्रम लॅण्डरचा प्रवास इस्त्रोच्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स (MOX) च्या स्क्रीनवर एका ग्राफद्वारे दिसत होता. या ग्राफमध्ये तीन रेषा दिसत आहेत. यातील मधली लाल रंगाच्या रेषेद्वारे विक्रम लॅण्डर चंद्राकडे प्रवास करत असल्याचे दिसत होते. तर विक्रम लॅण्डरचा रियल टाईम पाथ हिरव्या रंगाच्या रेषेमध्ये दिसत होता आणि ही हिरव्या रंगाची रेषा लाल रंगाच्या रेषेवर होती.

बांग्लादेशीने ‘विक्रम’ हरवल्याच्या आनंदात रसगुल्ला खाल्ला आणि ढगात गेला!

सर्वकाही सुरळीत सुरू होते. विक्रम लॅण्डरची रियल टाईम पाथची हिरवी रेषा आणि निर्धारित मार्गाची लाल रेषा समांतर एकसाथ पुढे जाताना दिसत होती. यावेळच्या फोटोकडे निट पाहिले असता चंद्रापासून 4.2 किलोमीटरवर असताा विक्रम लॅण्डरच्या रस्त्यात थोडा बदल झाला होता, परंतु तोपर्यंत सर्व सुरळीत होते. चंद्रापासून 2.1 किलोमीटर विक्रम लॅण्डर आले असता ते वेगळ्याच दिशेकडे जावू लागले. यावेळी त्याचा वेग 59 मीटर प्रति सेकंद (212 किमी/सेकंद) एवढा होता.

vikram-lander

विक्रम लॅण्डर 400 मीटरवर असताना ज्या वेगामध्ये त्याला चांद्रभूमीवर उतरायचे होते त्या वेगामध्ये ते आले होते. 400 मीटर ते 10 मीटरपर्यंत प्रति सेकंद फक्त 5 मीटर वेगाप्रमाणे ते खाली नेण्यात येणार होते. 10 ते 6 मीटरपर्यंत 1 ते 2 मीटर प्रतिसेकंद आणि त्यानंतर त्याची वेग शून्य करण्यात येणार होती. 15 मिनिटांच्या या कार्यक्रमादरम्यान पहिले 13 मिनिटं व्यवस्थित गेली, मात्र 13 व्या मिनिटाला मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स (MOX) स्क्रीनवर सर्वकाही स्थिर झाले. त्यावेळी विक्रम लॅण्डरचा वेग 59 मीटर प्रति सेकंद (212 किमी/सेकंद) एवढा होता. यावेळी चंद्रापासून 400 मीटर अंतरावर एक हिरव्या रंगाचा टिपका दिसून आला आणि विक्रम लॅण्डरचा संपर्क तुटला.

आपली प्रतिक्रिया द्या