ऋतूनुसार पिण्याच्या पाण्याचे भांडे बदला, जाणून घ्या कोणत्या ऋतूमध्ये आरोग्यासाठी काय फायदेशीर ठरेल

निरोगी राहण्यासाठी दररोज ३ लिटर पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देताना आपण कायम ऐकलेले आहे. पाणी पिल्याने केवळ पचनसंस्था निरोगी राहतेच असे नाही तर शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर पडतात. यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार होते. तसेच आपले वजन नियंत्रित राहण्यासही मदत मिळते. हे पाणी पिण्याचे फायदे आहेत. पण पाण्याचे फायदे मिळविण्यासाठी कोणत्या ऋतूत आणि कोणत्या भांड्यात पाणी प्यावे?

पित्तावर करा ‘हे’ घरगुती खात्रीशीर उपाय, वाचा

उन्हाळ्यात बहुतेक जण फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पाणी पितात. फ्रीजमधील थंड पाणी शरीराला त्वरित थंडावा देऊ शकते परंतु त्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारचे नुकसान होते. अशा परिस्थितीत, उन्हाळ्यात फ्रीजच्या पाण्याऐवजी तुम्ही मातीच्या भांड्यातील पाणी पिऊ शकता. माती पाणी नैसर्गिकरित्या थंड ठेवते. मातीमध्ये असलेले खनिजे जसे की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पाण्यात विरघळतात आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर बनवतात.

पावसाळ्यात लोकांना पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा सर्वाधिक त्रास होतो. या ऋतूत बॅक्टेरिया आणि संसर्गाचा धोका सर्वाधिक राहतो. अशा परिस्थितीत, तांब्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे पाणी शुद्ध करतात आणि हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतात. रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून सकाळी रिकाम्या पोटी ते प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.

पायदुखीवर ‘ही’ तेलं आहेत प्रभावी, मिळेल एका आठवड्यात आराम

शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यात सोन्याच्या भांड्यातील पाणी पिणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. वाढत्या महागाईत प्रत्येकासाठी सोन्याचे भांडे असणे आवश्यक नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही कोणत्याही भांड्यात सोन्याची अंगठी किंवा ब्रेसलेट घालून पाणी पिऊ शकता. सोन्याचे पाणी पिल्याने नैराश्य, निद्रानाश आणि नकारात्मक विचारांशी लढण्यास मदत होते. याशिवाय सोन्याचे पाणी खोकला, सर्दी आणि फ्लू सारख्या हंगामी आजारांपासून देखील आराम देते.