
केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठीची आरोग्य योजना (सीजीएचएस) आणि निवृत्त सैनिकांसाठीची आरोग्य योजना (ईसीएचएस) यामध्ये बदल केला आहे. 15 डिसेंबर 2025 पासून सुधारित सीजीएचएस/ईसीएचएस दर लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. यासोबतच, सर्व विद्यमान करार याच तारखेच्या मध्यरात्रीपासून रद्द मानले जातील. याचा अर्थ असा की, आता सर्व खासगी रुग्णालयांना पुन्हा डिजिटल अर्ज करून पॅनेलवर कायम राहण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जी रुग्णालयं वेळेत अंडरटेकिंग जमा करणार नाहीत, त्यांना आपोआपच डिपॅनेल मानले जाईल.
नवीन नियम खर्चांमध्ये एकरूपता आणणं, डिजिटल क्लेम प्रक्रिया सुधारणं आणि रुग्णालयांची जबाबदारी वाढवण्याच्या उद्देशाने आणले गेले आहेत. देशभरातील लाभार्थींना फायदा सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम देशभरातील सीजीएचएस आणि ईसीएचएस लाभार्थींवर पडेल.
2025 मध्ये सीजीएचएस प्रणालीत अनेक मोठे अपडेट्स यापूर्वीच करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ निवृत्ती वेतनधारकांसाठी पॅशलेस उपचाराची सुविधा वाढवणं, रेफरल प्रणाली पूर्णपणे डिजिटल करणं, रुग्णालयांवर कठोर पेनल्टी लावणं आणि टेली-कन्सल्टेशन सेवा वाढवणे. यासोबतच, शस्त्रक्रिया, डायग्नोस्टिक्स, आयसीयू, डायलिसिस आणि रूम भाडयासारखे दरही अपडेट करण्यात आले आहेत, जेणेकरून खासगी रुग्णालयांच्या मानकांनुसार उत्तम उपचार मिळू शकेल.


























































