कोरोनापाठोपाठ आता जगाला चापरे विषाणूच्या थैमानाची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे जग कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देत असतानाच दुसरीकडे मानवाकडून मानवाला संसर्ग होणारा चापरे नावाचा आणखी एक विषाणू वैज्ञानिकांना आढळून आला आहे. अमेरिकेतील आरोग्य विषयक संस्था असणाऱया सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनेही (सीडीसी) हा विषाणू सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बोलिव्हियामध्ये या विषाणूच्या संसर्गाचे पुरावे आढळून आले आहेत. या विषाणूचा संसर्ग ताप येतो आणि हा ताप थेट मेंदूवर परिणाम करतो. या विषाणूमुळे ब्रेन हॅमरेजचा धोका असतो. हा विषाणू इबोलासारखाच आहे. इबोला हा विषाणूही संसर्ग होण्याच्या दृष्टीने खूपच धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यात यशही आले होते. लाइव्ह सायन्सने दिलेल्या वृत्तानुसार सीडीसीने 2019 साली या विषाणूचा संसर्ग तीन आरोग्य कर्मचाऱयांना झाल्याचे स्पष्ट केले आहे. या तिघांपैकी दोघांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याचेही सीडीसीने सांगितले आहे.