आयसीआयसीआय बँकेचा ग्राहकांना दणका;पैसे काढायला-भरायला लागणार शुल्क

559

डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या नावाखाली आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. आयसीआयसीआय बँकझीरो बॅलन्सअसलेल्या खातेदारांकडून पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी आता 100 ते 125 रुपये आकारणार आहे. ग्राहकानेसीडीएम’ (कॅश डिपॉझिट मशीन)ने पैसे भरले तरी त्याच्याकडून तेवढेच शुल्क वसूल केले जाणार आहे.

डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतल्याचे बँकेने सांगितले. त्यानुसार एनईएफटी, आरटीजीएस, यूपीआय इंटरनेट बँकिंगवरील सेवाशुल्क बँकेने रद्द केले आहे. या आधी आयसीआयसीआयच्या एनईएफटी आणि आरटीजीएस व्यवहारांवर जीएसटीसह सेवा शुल्क आकारले जात असे. हे शुल्क 2 रुपये 25 पैशांपासून ते 45 रुपयांपर्यंत होते.

डिजिटल व्यवहार मोफत करा आरबीआय

काही महिन्यांपूर्वी डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) डिजिटल व्यवहार पूर्णपणे विनामूल्य केले जावे असे देशातील सर्व बँकांना आदेश दिले होते. त्यानंतर बँकांनी एनईएफटी, आरटीजीएस, यूपीआय आणि इतर इंटरनेट बँकिंगशी संबंधित व्यवहार विनामूल्य करण्याचे आश्वासन आरबीआयला दिले होते. तरी आता बँकांनी ग्राहकांना लुटणे सुरू ठेवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या