चार्ली कर्क यांच्या मारेकऱ्याला अटक, ट्रम्प म्हणाले, फाशीची शिक्षा व्हायला हवी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उजवा हात असलेले 31 वर्षीय तरुण नेते चार्ली कर्क यांची बुधवारी भरसभेत गोळी घालून हत्या करण्यात आली. हत्येनंतर तत्काळ अमेरिकेची तपास संस्था FBI ने मारेकऱ्याला शोधण्यासाठी शोध मोहिम सुरू केली. दरम्यान कर्क यांच्या हत्येच्या 24 तासानंतर पोलिसांनी त्यांच्या मारेकऱ्याला अटक केली आहे.

टायलर रॉबिनसन असे त्या संशयित मारेकऱ्याचे नाव असून तो 22 वर्षांचा आहे. रॉबिनसन हा मूळचा अमेरिकेतील उटाहचा आहे. रॉबिनसनच्या वडिलांनीची त्याला अटक करण्यासाठी FBI ची मदत केल्याचे समजते.

दरम्यान ट्रम्प यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ”मला असं वाटतं आरोपी आमच्या ताब्यात आहे. त्याच्या जवळच्याच व्यक्तीने आम्हाला त्याची माहिती दिली. मला आशा आहे की तो दोषी सापडेल व त्याने जे केले त्यासाठी त्याला मृत्युदंडाची शिक्षा होईल. चार्ली कर्क हा एक चांगला व्यक्ती होता व त्याच्यासोबत असं व्हायला नको होतं, असे ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उजवा हात असलेले 31 वर्षीय तरुण नेते चार्ली कर्क यांची बुधवारी भरसभेत गोळी घालून हत्या करण्यात आली. युटा कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना चार्ली कर्क यांच्यावर गोळी झाडण्यात आली. ही गोळी थेट त्यांच्या मानेत घुसली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात रक्तबंबाळ अवस्थेतील चार्ली गोळी लागल्याच्या ठिकाणी हात दाबून रक्तप्रवाह थांबवताना दिसत आहेत. तर, घाबरलेले विद्यार्थी आरडाओरडा करत पळताना दिसत आहेत.