वाजपेयी यांना चतुरंग प्रतिष्ठानचा ‘अभिमानमूर्ती’ पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे देण्यात येणारा ‘अभिमानमूर्ती’ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना घोषित करण्यात आला आहे.

दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा पुरस्कार प्रदानाचा सोहळा ऑक्टोबरमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित केला जाणार आहे. ध्येय म्हणून एखादे कार्यक्षेत्र निवडून त्या कार्यासाठी, त्या विषयासाठी निरपेक्ष वृत्तीने स्वतःच्या आयुष्याचे योगदान देऊन देशाकरिता भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला चतुरंग प्रतिष्ठानतर्फे ‘पर्सन ऑफ प्राइड’ अर्थात ‘अभिमानमूर्ती’ हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षीचा पुरस्कार हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना जाहीर करण्यात आला आहे. जमिनीवर पाय ठेवून आकाशात झेप घेऊ पाहणारी मानवाकृती स्वरूपातले सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.