छगन भुजबळ गो बॅक! मराठा समाजाचा प्रचंड संताप, काळे झेंडे दाखवत ताफा अडवला

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी निघालेले मंत्री छगन भुजबळ यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागतोय. नाशिकमधील येवला या त्यांच्याच मतदारसंघात मराठा समाजाने काळे झेंडे दाखवत त्यांचे स्वागत केले असून ‘छगन भुजबळ गो बॅक’, अशी तुफान घोषणाबाजी करत ताफाही अडवला. एवढेच नाही तर छगन भुजबळ यांचा ताफा ज्या मार्गावरून गेला तो मार्गही मराठा समाजाच्या आंदोलकांनी गोमूत्र शिंपडून शुद्ध केला.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा गुरुवारी सकाळच्या सुमारास सोमठाण देश या गावात दाखल झाला. नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या भुजबळांना मराठा आंदोलकांनी विरोध केला असून आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. त्यानंतर लासलगावातील कोटमगावातही भुजबळांना मराठा समाजाच्या संतापाचा सामना करावा लागला. येथे मराठा समाजाने भुजबळांचा ताफा अडवला आणि काळे झेंडे दाखवत ‘छगन भुजबळ गो बॅक’च्या घोषणा दिल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)