सुविधांचा पत्ता नाही; भाडेही दुपटीने वाढवले

474

 नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घिसाडघाईत उभे केलेले छत्रपती शाहू महाराज नाटय़गृह दुर्लक्षीत राहिल्यामुळे छताला गळती लागली आहे. कोणत्याही सुविधा या नाटय़गृहात नसताना प्रशासनाने मात्र नाटय़गृहाच्या भाडय़ात दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत या नाटय़गृहात एकही नाटकाची घंटाच वाजलेली नाही. त्यामुळे उत्पन्ना अभावी हे नाटय़गृह बंद पडले आहे.

खोपोली नगरपालिकेने सुमारे आठ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या दोन मजली नाटय़गृहाचे उद्घाटन ऑक्टोबर 2016 मध्ये नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उरकवण्यात आले होते. हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला होता. त्यावेळी  या इमारतीचे छत झोपडपट्टीप्रमाणे प्लॅस्टिकच्या कागदाने शेकारण्यात आले होते. तीच अवस्था आता तीन वर्षांनंतरही कायम आहे. छताला लागलेली गळती प्रशासनाला थांबवता आली नाही. नाटय़गृहात कोणतीही सुविधा नाही. त्यातच प्रशासनाने भाडे दुप्पट केले आहे. ते नाटकाच्या निर्मात्यांना परवडत नसल्याने त्यांनी नाटय़गृहाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत या नाटय़गृहात एकही नाटक झाले नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या