
छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसेचा दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या दीपोत्सवाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
मनसेकडून साजरा होणार दीपोत्सव हा गेल्या काही वर्षांपासून आकर्षणाचा विषय ठरत आहे. या दीपोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज परिसरात नेत्रदीपक रोषणाई केली जाते. ही रोषणाई पाहण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोकं येत असतात.


























































