एअरसेल-मॅक्सिस प्रकरण; चिदंबरम आरोपी नंबर 1

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी यूपीए सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याभोवतीचा फास आवळण्यात आला आहे. गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पतियाळा हाऊस न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात एकूण नऊ जणांची नावे आरोपी म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यामध्ये चिदंबरम यांचे नाव आरोपींच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

पतियाळा हाऊस न्यायालयाने याप्रकरणी सुनावणीची तारीखही निश्चित केली आहे. 26 नोव्हेंबरला आरोपपत्रावर सुनावणी होईल. तत्पूर्वी, गुरुवारी सकाळी चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून थोडासा दिलासा मिळाला होता. न्यायालयाने चिदंबरम यांना हंगामी संरक्षण 29 नोव्हेंबरपर्यंत वाढवले होते.

‘ईडी’च्या पुरवणी आरोपपत्रात कार्ती चिदंबरम, पी. चिदंबरम यांच्यासहित एस. भास्करन (कार्ती यांचे सीए), श्रीनिवासन (एयरसेलचे सीईओ), ए. राल्फ मार्शल. ऍस्ट्रो ऑल एशिया नेटवर्क मलेशिया, एअरसेल टेलिवेंचर्स लिमिटेड यांच्यासह नऊजणांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

summary-chidambaram is main accuse in aircel maxis case