चिदंबरम यांची तुरंगात पहिली रात्र बेचैनीची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी येथील न्यायालयाने ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत केली आहे. तेथे ते 19 सप्टेंबरपर्यंत राहणार आहेत. तिहार कारागृहात त्यांची पहिली रात्र बेचैनीची गेल्याचे सांगण्यात येते. रात्रभर त्यांना शांत झोपू शकले नाहीत. सुरक्षिततेसाठी म्हणून चिदंबरम यांना एका वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले आहे.