
सात वर्षांच्या मुलाचा लिफ्टच्या डकमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे अंधेरीच्या गिल्बर्ट हिल परिसरात घडली. राजीक मेहबूब खान असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. राजीक हा शुक्रवारी रात्री एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गिल्बर्ट हिल परिसरात आला होता. खेळता खेळता तो हॉलशेजारील एका इमारतीजवळ गेला. पाय घसरून तो लिफ्टच्या डकमध्ये पडला. नातेवाईकांनी राजीकला लिफ्टमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी राजीकला तपासून मृत घोषित केले.
































































