
कोरोनाच्या तिसऱया लाटेत मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा आरोग्यतज्ञांनी दिल्यामुळे पालिकेने 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी वेगाने कार्यवाही सुरू केली असताना मुलांकडून मात्र नोंदणीसाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. नायर रुग्णालयात आठवडाभरापासून लसीकरण ‘ट्रायल’साठी नोंदणी सुरू होऊनही आतापर्यंत केवळ पाच मुलांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे मुलांसह पालकांनीही लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिकेचे वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी केले आहे.
पालिकेच्या नायर रुग्णालयात 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या पाठपुराव्यानंतर ‘झायडस क@डिला’ पंपनीने लसीकरणासाठी तयारी दर्शवली आहे. या ‘ट्रायल’मध्ये 50 मुलांना ‘झायकॉडी’ लस देण्यात येणार आहे. यासाठी आठवडाभरापूर्वी नायर रुग्णालयात नोंदणी सुरू झाली. यामध्ये मुलांना नायर रुग्णालयामध्ये येऊन नोंदणी करावी लागत आहे. या लसीकरणात 12 ते 18 वर्षे वयोगटाच्या मुलांना ‘झायकॉडी’ लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी, 28 व्या दिवशी आणि 56 व्या दिवशी डोस दिला जाईल. लहान मुलांच्या लसीकरणासाठी नायरमध्ये प्रशिक्षित कर्मचाऱयांसह आवश्यक सर्व यंत्रणा तैनात आहे. त्यामुळे मुलांची नोंदणी झाल्यानंतर तातडीने लसीकरणाची ट्रायल सुरू होईल.
निर्धास्तपणे लस घ्या!
पालकांमध्ये असणारा गैरसमज, काळजीमुळेच नोंदणीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र मुलांना त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर, मुले-पालकांच्या शंकांचे निरसन केल्यानंतर आणि काऊंन्सिलिंग केल्यानंतरच नोंदणी केली जात असल्याचे डॉ. भारमल म्हणाले.
आरोग्यतज्ञांनी दिलेल्या इशाऱयानुसार ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसऱया लाटेचा प्रभाव दिसू लागणार आहे. यात लहान मुलांना धोका असल्याचा इशारा देण्यात आल्यामुळे पालकांनी पुढाकार घेऊन लसीकरणासाठी पुढे यायला हवे.
मुंबईत 6 ते 12 वर्षे वयोगटातील सुमारे 25 लाखांवर मुले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून या सर्व मुलांचे लसीकरण लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. यासाठी पालिकेने आपली सर्व यंत्रणा तैनात ठेवली आहे. यासाठी ‘ट्रायल’ वेळेत होणे गरजेचे आहे, असे डॉ. भारमल म्हणाले.

























































