
हिंदुस्थानलगतच्या सीमावर्ती भागात चिनी ड्रगनच्या हालचाली वाढल्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनकडील भागात सैन्य आणि युध्द साहित्याची जमवाजमव केली जात आहे. चीनचे हवाईदलच सीमेवर उतरले आहे. अण्वस्त्रवाहू विमाने, सहा हजार किलोमीटरपर्यंत मारा करणारी फायटर विमाने आणि हजारो चिनी सैनिक सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून ठिकठिकाणी युद्धसराव होत आहे. हा केवळ सराव नसून युद्धाची तयारी असल्याचे संरक्षण तज्ञांचे म्हणणे आहे.
लष्करी हालचालींवर बारीक लक्ष ठेवणार्या ‘डिट्रेस्फा’ने उपग्रहांद्वारे घेतलेली छायाचित्रे जाहीर केली आहेत. त्यात चीनची बॉम्बर विमाने तैनात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हिंदुस्थानलगतच्या सीमेवरील काशगर हवाई तळावर चीनने विमानांचा ताफाच उतरवला आहे. त्यात 6 शियान एच-6 बॉम्बर विमानांचा समावेश आहे. त्यातील दोन विमानांवर तर क्षेपणास्त्रही लावली गेली असल्याचे छायाचित्रात दिसत आहे. याशिवाय 12 शियान जेएच-7 फायटर बॉम्बरही आहेत. त्यातील दोन बॉम्बर विमाने शस्त्रसज्ज करून ठेवली गेली आहेत. 3530 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेली 4 शेनयांग जे-11 आणि जे-16 फायटर विमानेही चीनने तयार ठेवली आहेत.
शेनयांग विमानावर 30 मिलीमीटरची एक तोफही असते. तसेच विविध प्रकारची क्षेपणास्त्रही त्याकरून वाहून नेली जाऊ शकतात. काशगर हवाई तळावर चीनने विमानांचा ताफाच उतरवला आहे. त्यात 6 शियान एच-6 बॉम्बर विमानांचा समावेश आहे.
हिंदुस्थानच्या सीमेलगतचे आठ चिनी हवाईतळ सक्रिय
चीनने कधी नव्हे ते आता हिंदुस्थानच्या सीमेलगतचे आपले आठ हवाईतळ सक्रिय केले आहेत. शिनजियांग प्रांतातील होटान हवाईतळावर चिनी फायटर जेट आणि अवाक्स विमाने तैनात असल्याची छायाचित्रेही उपग्रहाने टिपली होती. या हवाई तळावर शेनयांग जे-8 इंटरसेप्टर विमान आणि शेनयांग की फाल्कर विमानेही दिसून आली आहेत. तसेच अकाक्स विमानांमध्ये शनाक्सी काय-8जी आणि केजे-500 जातीच्या विमानांचा समावेश आहे. याशिवाय विविध ठिकाणी नवे हेलिपॅड्स आणि बंकर्सही गुप्तपणे बांधले आहेत.
घातक विमानांचा युद्धसराव
चीनने सीमेवर तैनात केलेले एच-6 बॉम्बर हे अत्यंत घातक विमान समजले जाते. अण्वस्त्र काहून नेण्याची क्षमता त्यात आहे. काशगर हवाई तळ लडाखपासून 600 किलोमीटरवर आहे तर एच-6 बॉम्बर सहा हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. चिनी सैन्याने दक्षिण चीनमधील समुद्रात नुकताच युद्धसराव केला. त्या सरावात एच-6जे आणि एच-6जी या अत्याधुनिक विमानांचा वापर केला गेला. एच-6 जे या विमानावरून जहाजरोधी 12 सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र एकाचवेळी वाहून नेली जाऊ शकतात. त्यातील सहा क्षेपणास्त्र या विमानांच्या पंखांखाली लावता येतात.
चीनच्या ताफ्यात 250 शेनयांग
शेनयांग लढाऊ विमानाचा वेग ताशी अडीच हजार किलोमीटर आहे. या जातीची 250 विमाने चीनच्या ताफ्यात आहेत. हे विमान म्हणजे रशियाच्या एसयू-27 विमानाची आकृत्ती आहे. हवाई हद्दीच्या रक्षणाबरोबरच जमिनीवर हल्ले करण्यासाठीही शेनयांग सक्षम आहे.


























































