
गलवान खोऱयातील हिंदुस्थान आणि चिनी सैनिकांतील संघर्षाच्या दुसऱयाच दिवशी चीनने बांगलादेशच्या 5161 वस्तूंवरील आयात शुल्क 97 टक्क्यांपर्यंत माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चीनमध्ये बांगलादेशातील या 5161 वस्तुंना चीनची मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. चीन आणि पाकिस्तानची घट्ट मैत्री आहे. नेपाळही पूर्णपणे चीनच्या कह्यात गेला आहे. आता व्यापारात सवलती देऊन चीन बांगलादेशाला आपल्या बाजूला वळवून घेत आहे.
5161 वस्तूंच्या व्यापारावरील 97 टक्के शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव चीनने बांगलादेशला दिला आहे. अविकसित देश असल्यामुळे बांगलादेशने शुल्कामध्ये माफी मागितली होती आणि योगायोग म्हणजे गलवान खोऱयातील संघर्षानंतर दुसऱयाच दिवशी 16 जूनला चीनने बांगलादेशच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. येत्या एक जुलैपासून बांगलादेशला हा लाभ मिळणार आहे. या खेळीमागे बांगलादेशबरोबरील मैत्री संबंध अधिक दृढ करण्याची चीनची भूमिका आहे. शुल्कमाफीमुळे बांगलादेशचा आर्थिक लाभ होणार आहे.
गलवान खोऱयातील संघर्षानंतर हिंदुस्थान आणि चीन यांच्यातील संबंध अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. चीन सीमेवर जी आगळीक करीत आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थान वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करत आहे. खास करून हिंदुस्थानी ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करून चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्याचा हिंदुस्थानचा प्रयत्न आहे. हिंदुस्थानी लोक चिनी मालावर बहिष्कार टापू लागले असल्याचे पाहून चीनही हिंदुस्थानची चोहोबाजूंनी काsंडी करण्यासाठी पुढे सरसावला असून बांगलादेशवगळता हिंदुस्थान शेजारचा प्रत्येक देश चीनच्या जवळ गेलेला आहे. बांगलादेश मात्र हिंदुस्थानचा अत्यंत जवळचा मित्र आहे. मात्र, त्याने चीनला सवलत मागितली आणि चीनने ती दिल्यानंतर परिस्थितीत बदल होऊ शकतो. शुल्कमाफीमुळे बांगलादेशचा आर्थिक लाभ होणार आहे.

























































